Gold Price Today : सोने- चांदी खरेदीदारांना धक्का ! आज सोन्याच्या दरात झाली ‘एवढ्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

Published on -

Gold Price Today : जर तुम्ही सोने- किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

बुधवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 173 रुपयांनी तर चांदीचा भाव 382 रुपयांनी वाढला आहे. महत्वाचे म्हणजे तेजीनंतरही सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 680,000 रुपये प्रति किलो पातळीच्या खाली विकली जात आहे.

बुधवारी या व्यापारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली. बुधवारी सोने प्रति 10 ग्रॅम 173 रुपयांनी महागले आणि 57538 रुपये प्रति किलोवर बंद झाले आहे.

बुधवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली. तसेच बुधवारी चांदीचा भाव 382 रुपयांनी वाढून 67134 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 472 रुपयांनी घसरून 67134 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

या वाढीनंतर 24 कॅरेट सोने 173 रुपयांनी महाग होऊन 57538 रुपये, 23 कॅरेट सोने 173 रुपयांनी महागून 57308 रुपये, 22 कॅरेट सोने 159 रुपयांनी 52705 रुपये, 18 कॅरेट सोने 130 रुपयांनी वाढून 43154 रुपये आणि 14 कॅरेट सोने 130 रुपयांनी महागले आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News