आनंदाची बातमी ! एमपीएससीच्या माध्यमातून ‘या’ पदाच्या 274 रिक्त जागा भरल्या जाणार, अधिसूचना जारी, वाचा सविस्तर

Ahilyanagarlive24 office
Published:

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या वर्ष 2024 मधील पहिली भरती जाहीर करण्यात आली आहे.

खरंतर एमपीएससीच्या परीक्षांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट घेतले जात आहेत. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील विविध संवर्गातील विविध पदाच्या 274 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमपीएससीच्या माध्यमातून राज्यसेवेतील सामान्य प्रशासन विभागातील गट अ व गट ब, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतील मृद व जलसंधारण विभागातील गट अ व गट ब, महाराष्ट्र वन सेवेतील महसुल व वन विभागाच्या गट अ व गट ब मधील रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी अर्ज सादर करण्याचे आणि परीक्षा शुल्क भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या भरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती ?:-  अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, राज्य सेवा, गट अ व गट ब (सामान्य प्रशासन विभाग) : 205 जागा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, गट अ व ब (मृद व जलसंधारण विभाग): 26 जागा आणि महाराष्ट्र वन सेवा, गट अ व गट ब (महसुल व वन विभाग) : 43 जागा अशा एकूण 274 रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता :- राज्यसेवेच्या सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी अथवा 55 टक्के गुणांसह बी.कॉम + सीए / आयसीडब्ल्युए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. याशिवाय, महसूल व वन विभागातील रिक्त पदांसाठी रसायनशास्त्र / वनस्पतीशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य पात्रताधारक उमेदवार पात्र राहणार अशी माहिती अधिसूचनेतून समोर आली आहे. तथापि, इच्छुक आणि पात्र उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. तसेच रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार पाच वर्षांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.

अर्ज कुठं करावा लागणार? :- या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- या भरतीसाठी 24 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक देखील 24 जानेवारी राहणार आहे. दरम्यान इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित कालावधीत परीक्षा शुल्कासह अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe