रेल्वेने प्रवाशांना खूशखबर ! आता स्लीपरच्या किमतीत करा एसी कोचमध्ये प्रवास, जाणून घ्या माहिती..

Published on -

Railway News : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. या माध्यमातून रेल्वेला पैसेही मिळतात. या कारणास्तव, रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक प्रकारच्या ऑफर देत असते, ज्यामुळे लोक कमी पैशात प्रवास करू शकतात. आजच्या काळात बहुतांश लोकं रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो. दरम्यान, प्रवाशांना स्लीपरच्या पैशात एसी डब्यांचा आनंद घेता यावा, यासाठी रेल्वेने तिकिटांच्या दरात कपात केली आहे.

*रेल्वे मंत्रालयाची घोषणा

रेल्वे मंत्रालयाने शनिवार, 8 जुलै 2023 रोजी गाड्यांच्या एसी क्लासच्या तिकिटांच्या किंमतीत 25% कपात करण्याची घोषणा केली आहे. ही सवलत त्या गाड्यांसाठी आहे ज्यांची आवक कमी आहे. अनुभूती आणि विस्टाडोम कोचसह सर्व एसी डब्यांवर तात्काळ हे लागू होईल.

*नियम व अटी

वरील घोषणेच्या अंमलबजावणीसाठी काही अटी पुढीलप्रमाणे आहेत.

– या घोषणेपूर्वी ज्यांनी तिकिटे बुक केली होती, त्यांना या घोषणेचा फायदा होणार नाही.

– गेल्या 30 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या वाहनांसाठी सध्या ही योजना राबविण्यात येत आहे.

– ही योजना सुट्यांमध्ये किंवा सणासुदीच्या काळात धावणाऱ्या विशेष गाड्यांवर लागू होणार नाही.

*महत्वाचे

– एसी ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के कपात

– लागू होण्याची तारीख : 8 जुलै 2023

– लागू होणाऱ्या गाड्यांची यादी

– अनुभूती, विस्टाडोम डब्यांसह अशा सुविधा असलेल्या सर्व गाड्यांवर.

– योजनेचा लाभ – ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुक केले नाही त्यांना

– सुट्टी आणि सणांच्या दिवशी ही योजना ट्रेनमध्ये लागू होणार नाही.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!