Pune Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छट सणाच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुण्याहून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-जोधपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सणासुदीच्या काळात मोठी सोय होणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-जोधपूर (गाडी क्रमांक ०४८०८) ही रेल्वे २७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी (शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पुण्याहून सुटेल, दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी जोधपूरला पोहचणार आहे.
जोधपूर-पुणे साप्ताहिक (गाडी क्रमांक ०४८०७) ही रेल्वे २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी जोधपूरहून दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहे.
ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
या विशेष साप्ताहिक ट्रेनला या मार्गावरील लोणावळा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, दुर्गापूर, जयपूर, फुलेरा, नवा शहर, कुचमन शहर, मकराना डेगाणा व मेटरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.