Maharashtra News : जमीन खरेदी विक्री हा महसुलाचा एक अत्यंत महत्वाचा भाग. या कामामध्ये नागरिकांची सोय व्हावी, सुसूत्रता यावी यासाठी महत्वाचा निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे घेणार आहेत.
महसूल विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आता राज्यात शनिवार आणि रविवारी उपनिबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहेत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Maharashtra-News.jpeg)
त्यामुळे आता शनिवार आणि रविवारी खरेदी-विक्री होणार आहे. राज्यात काही ठिकाणी हा प्रयोग सुरू करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगर शहरात नवीन महसूल इमारतीचे भूमिपूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
विखे पाटील म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांना आठवड्याचे पाच दिवस अर्थात सोमवार ते शुक्रवार पर्यंत नोकरीस जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शनिवार रविवार देखील कार्यालये सुरु ठेवण्याची योजना आहे. सर्व शासकीय कामे एकाच छताखाली कशी येतील याचे नियोजन सुरु हाये.
म्हणजे नागरिकांना जास्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यामुळे आता राज्यात लवकरच शनिवार आणि रविवारी उपनिबंधक कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.
समन्यायी पाणी वाटप
दरम्यान यावेळी त्यांनी समन्यायी पाणी वाटपबाबत देखील भाष्य केले. कारण सध्या महाराष्ट्रात अपुरा पाऊस पडला. त्यामुळे अनेक धरणांत पाणीसाठा कमी आहे. त्यातच आता जायकवाडीसाठी पाणी मागितल्याने पाणीप्रश्न पेटणार अशी चित्रे आहेत.
यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय समन्वयाने घ्यावा. वर असणाऱ्या धरणातील पाणीसाठा आणि जायकवाडीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रश्न श्रेयाने नव्हे, तर समन्वयाने सुटतील. मेढीगिरी समितीचा आढावा घेण्याची गरज आहे. समन्यायी पाणी वाटपात जिल्ह्यात अन्याय होणार नाही. पाण्याच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
शाळेच्या परिसरातील गुटखा विक्री
राज्यात गुटख्यावर बंदी असूनही गुटख्याची विक्री केली जात आहे. शाळा महाविद्यालयाच्या आवारात गुटखा विक्री होणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा ठिकाणांवर संबंधित विभागाकडून कडक कारवाई होण्याची मोठी गरज आहे. आता या सर्वप्रकरणांची दखल घेत यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे विखे म्हणाले.