गुड न्यूज ! दोन नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा, मुंबई आणि पुणेसाठी…

Mahesh Waghmare
Published:

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाला केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. या दोन ट्रेनमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

लवकरच अमरावतीहून मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. विदर्भातील अमरावती शहराला थेट मुंबई आणि पुण्याशी जोडणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. या घोषणेमुळे अमरावतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विदर्भासाठी महत्त्वाची संधी
अमरावतीमधून पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेन सुरू होत असल्याने हा विदर्भासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विदर्भातील रेल्वे सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने हा मोठा निर्णय मानला जात आहे.

अंतिम मान्यता प्रलंबित
रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यावर लवकरच या ट्रेनची वेळापत्रके आणि थांब्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल.

वंदे भारत नेटवर्क
सध्या वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-गोवा, आणि मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावतात. या नव्या ट्रेनमुळे वंदे भारतचा विस्तार विदर्भापर्यंत पोहोचेल.

वंदे भारतची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक डिझाइन: वंदे भारत ट्रेनचे इंजिनविरहित डिझाइन आहे, ज्यामुळे ती वेगवान आणि ऊर्जा-कार्यक्षम ठरते.

जास्त वेग: ही ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.

स्वच्छता: स्वच्छता आणि हायजिनला प्राधान्य दिले जाते. दररोज कोच साफसफाई केली जाते.

प्रवाशांसाठी फायदे

वेळेची बचत: नवीन वंदे भारत ट्रेन वेगवान असल्याने प्रवासाचा कालावधी तुलनेने कमी होईल. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता जलदगती रेल्वे सेवा उपलब्ध होईल.

व्यापारासाठी संधी:
मुंबई आणि पुणे हे देशातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्रे आहेत. अमरावतीतील व्यापाऱ्यांना थेट कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या संधी निर्माण होतील.

शैक्षणिक फायदा: पुणे आणि मुंबई हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. या ट्रेनमुळे विद्यार्थ्यांना प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

पर्यटनाला चालना: विदर्भातील अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांना वंदे भारत ट्रेनमुळे अधिक लोकप्रियता मिळू शकते.

आरामदायी प्रवास: वंदे भारत ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा, एसी कोच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्वच्छतागृह, आणि उत्तम आसनव्यवस्था असल्याने प्रवासाचा अनुभव आरामदायी होईल.

 

मुंबई-अमरावती वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे

अमरावतीहून सुटण्याची वेळ: पहाटे 3:40 वाजता
मुंबईत पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:10 वाजता
प्रवासाचा कालावधी: साडे सहा तास
थांबे: अमरावती,अकोला जंक्शन,शेगाव,भुसावळ जंक्शन,जळगाव जंक्शन,मनमाड, नाशिक जंक्शन,
मुंबईहून सुटण्याची वेळ: दुपारी 3:05 वाजता
अमरावतीत पोहोचण्याची वेळ: रात्री 11:25 वाजता

पुणे-अमरावती वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे
अमरावतीहून सुटण्याची वेळ: पहाटे 4:20 वाजता
पुण्यात पोहोचण्याची वेळ: दुपारी 12:25 वाजता
प्रवासाचा कालावधी: 8 तास 5 मिनिटे
थांबे: अमरावती,अकोला,भुसावळ,जळगाव,मनमाड,दौंड

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe