अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका नव्या निर्णयावरून देखील भाजपाकडून तीव्र शब्दांत नापसंती दर्शवली जात आहे.
महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठीउपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित असल्याची घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवारयांनी केलीय. तर राज्य सरकारला शेतकऱ्यांची नाही तर बेवड्यांची काळजी असल्याचा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.
शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करत आहे. बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणासारख्या पवित्र मंदिरांची काळजी.
ना तेथील लोकांची काळजी परंतु दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त करणा-यांना हे सरकार अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहे. हा निर्णय म्हणजे भरकटलेल्या सरकारने घेतलेला भरकटलेला निर्णय असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मस्त पियो, खूब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे.
करोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्यकता आहे. पण दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम