Maharashtra News : मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेत राहिलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घेतल्यामुळे साठ वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी निधी देता आला,
त्या उलट आताचे त्रिकूट सरकार मात्र फोडाफोडीचे राजकारण करण्यातच व्यस्त असून, या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही, या घोषणाबाज सरकारमुळे सर्वसामान्य जनता निराश असून, लवकरच पुन्हा एकदा तुमच्या मनातील सरकार राज्यात सत्तेवर येईल,
असा विश्वास व्यक्त करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ८५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण रस्ते,
पाणी, वीज, या प्रश्नांना प्राधान्य दिले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती दिली. या विरोधात आपण आपण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने ही स्थगिती उठवल्यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला.
फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या शंभर खोके, एकदम ओके, या सरकारवर सर्वसामान्य जनता नाराज असून, या सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदे नाही. हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून, लवकरच तुमच्या मनातील सरकार राज्यात येईल, असा विश्वास आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पं.स. सदस्य राहुल गवळी, सरपंच सुनंदा गवळी, उपसरपंच संजय शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अभिजीत ससाने, युवानेते अमोल वाघ, एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, जालिंदर वामन, राजू शेख, सरपंच सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, बंडू झाडे, दिलीप वांढेकर,
श्रीकृष्ण वांढेकर, रवींद्र मुळे, अंबादास डमाळे, सुभाष गवळी, बलभीम बनकर, विष्णू सोलाट, संभाजी झाडे राजू इनामदार, खलील पटेल, प्रदीप ससाणे यांच्यासह मिरी ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट या खिचडी सरकारमध्ये सहभागी नको,,,
पाथर्डी तालुक्यातील म येथील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मिरी गावच्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले आपले सरकार नाही त्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळवणं थोडं अडचणीच आहे मग सरकारमध्ये सामील व्हायचं का असे मुश्किल पणे म्हणताच उपस्थित शेतकऱ्यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता म्हणाले निधी कमी मिळाला तरी चालेल परंतु या खिचडी सरकारमध्ये सहभागी होऊ नका.