Edible oil prices : खाद्यतेल बाजारातील केंद्र सरकारच्या योग्य हस्तक्षेपामुळे खाद्यतेलांचे दर वर्षभर कमी ठेवण्यात यश आले असून, रिफाईंड सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल तसेच पामोलिन (आरबीडी) यांचे दर एका वर्षात अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
यामधील सरकारने रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेल यांच्यावरील मूलभूत शुल्क ३२.५ टक्क्यांवरून १७.५ टक्क्यांवर, तर रिफाईंड पामतेलावरील १७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्के आणले गेले आहेत.
ही शुल्क सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहणार असल्याने तोपर्यंत या खाद्यतेलांचे दर नियंत्रित राहतील, असेही सरकारी सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कच्चे पामतेल,
सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील अडीच टक्के मूलभूत शुल्क संपूर्णतः माफ करण्यात आले आहेत. तेलांवरील कृषी अधिभार २० टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के करण्यात आला आहे.
सध्या रिफाईंड पामतेलाची आयात विनाशुल्क सुरू ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. तसेच रिफाईंड सूर्यफूल तेल आणि रिफाईंड सोयाबीन तेल यांच्यावरील आयात शुल्क साडेसतरा टक्क्यांवरून साडेबारा टक्के करण्यात आले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत ही माहिती दिली.