Maharashtra News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील पॉलिहाऊस धारकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पॉलिहाऊससाठी असणाऱ्या विम्याच्या ७५ टक्के रक्कम आता सरकार भरणार आहे.
पॉलिहाऊससाठी विमा घेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याची तक्रार होती. अनेक लोक विम्यापासून दूर राहत असत. हीच समस्या लक्षात घेऊन आता सरकारने आता पॉलिहाऊसच्या विमा रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सरकार भरणार असा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार असून नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
स्वतः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिली. ते हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे गेले होते. पारनेरमध्ये गारपिटीने मोठे नुकसान झाले. याची पाहणी मंत्री विखे यांनी केली.
त्यानंतर ते अण्णा हजारे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी नुकसान भरपाई व नासाडी याबाबत चर्चा झाली. यावेळी विखे यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये सध्या पॉलिहाऊस धारकांची संख्या जास्त आहे. परंतु अनेकदा वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान लाखो रुपयांत होत असते. परंतु याला मिळणार विमा लाभ घेण्यासाठी जो विमा लागतो
ती रक्कम जास्त आहे. त्यामुळे अनेक लोक तो विमा घेत नाही. परंतु आता शासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून शासन ७५ टक्के विमा रक्कम भरेल.
* असा पाऊस पाहिला नाही
मी माझ्या ८८ वर्षाच्या काळात असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. मात्र यात कोणतीही मनुष्य हानी झाली नाही हे सुदैव आहे. मी कालच जिल्हाधिकारी यांना फोनवरून गारपिटीची माहीती दिली होती.
सरकारी अधिका-यांनी तातडीने नुकसानिचे पंचनामे करावेत व सरकारने तातडीने शेतक-यांना मदत द्यावी. तसेच जनावरांच्या चा-याची सोय करावी असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत.