Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.. फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक असा निर्णय घेतलाय. खरे तर सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तसेच याचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. डिसेंबर महिन्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्यात आणि आता जानेवारी 2026 मध्ये महापालिका निवडणुका संपन्न होणार आहेत.

दरम्यान नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले असून या यशामुळे गदगद झालेल्या महायुती सरकारने आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. केवायसीसाठी लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
सुरुवातीला ही मुदत 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतच होती मात्र या मुदतीत केवायसीची प्रक्रिया सर्व महिलांना करता येणे अशक्य होते आणि म्हणूनच मुदत वाढ देण्यात आली. यानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत पहिल्यांदा शासनाने केवायसीसाठी मुदतवाढ दिली आणि आता पुन्हा एकदा शासनाने केवायसीसाठी मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.
खरे तर, राज्यातील जवळपास 45 लाखाहून अधिक महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे. यामुळे केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी उपस्थित होत होती आणि अखेर केवायसी प्रक्रियेला आणखी एका महिन्याची मुदत वाढ मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता लाडक्या बहिणींना 30 जानेवारी 2026 पर्यंत केवायसी करता येणार आहे.
याशिवाय, शासनाने पती आणि वडील दोन्हीही हयात नसलेल्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत अशा लाभार्थ्यांची माहिती स्वातंत्रपणे संकलित करण्यासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे. नक्कीच केवायसी प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याने यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांची आतुरता लागली आहे. डिसेंबर महिना जवळपास संपत आला आहे तरीही नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. पण लवकरच लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार अशी माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
यावेळी शासन नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, केवायसीसाठी आता दोन दिवस मुदत राहिली आहे पण अजूनही 35 टक्के लाभार्थी केवायसी विना आहेत त्यामुळे केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र लाभार्थ्यांना मिळतील अशी आशा व्यक्त केली आहे.