लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उडघकीस आली. ही घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. सुरज राजेंद्र रायकर (२८) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. सुरजचे मंगळवारी लग्न होते.

सकाळीच सुरज घराबाहेर पडला. लग्न मुहूर्त जवळ आल्यानंतर सर्वत्र सुरजची शोधाशोध सुरू झाली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच तपासाला सुरुवात केली.

सुरजच्या घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरजची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना पाचारण करत विहिरीत शोध घेतला.

यावेळी नीलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, भास्कर माळी, सुरज शिंदे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, ओंकार भेगडे, आकाश पवार, कमल परदेशी यांनी शोध मोहिमेत भाग घेतला. सुरजचा याच विहिरीत मृतदेह आढळून आला.

लग्नाच्या दिवशी सुरजने केलेल्या आत्महत्येमुळे तळेगाव दाभाडे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहमद मुल्ला करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe