Gudipadwa gold update : सावधान ! गुढीपाडव्याला बायकोला सोनं घ्यायचंय, ही एक चूक तुम्हाला पडणार महागात…

Ahmednagarlive24 office
Published:

Gudipadwa gold update : गुढीपाडवा सण काही दिवसांवर आलेला आहे. अशा वेळी अनेकजण या शुभमुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करत असतात. अशा वेळी ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

कारण गुढीपाडव्याच्या महूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही या दिवशी बायकोला सोन्याचं गिफ्ट देणार असाल अथवा तसा काही प्लॅन असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

पुढील बाबतीत सावधान

आपण गुढीपाडव्याला सोनं विकत घेत असताना या चुका केल्या तर आपल खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ते टाळण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने ध्यानात ठेवा.

सोने खरेदी करताना 22 कॅरेट आणि 18 कॅरेटच्या दागिन्यांचे असणारे दर आधीच चेक करा. त्याचबरोबर सोने घडवण्याची मजुरी किती लावली जाते याची माहिती घेणंही गरजेचं आहे.

साधारणपणें सोन्याच्या 30 टक्के मेकिंग चार्ज आकारला जातो. मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा हा दुकानदारांना होतो. त्यामुळे आपल्या खिशाला कात्री लागते आणि आपल मोठ नुकसान होतं.

सोने खरेदी केल्यावर नेहमी सोन्याचं पक्क बिल घ्या. तसेच त्याची शुद्धता, योग्य वजन याचाही उल्लेख बिलामध्ये आहे की नाही ते तपासून घ्या.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे होलमार्किंग असलेले दागिनेच आपण खरेदी करावे. होलमार्क हा बनावट नाही. तसेच याची पडताळणी केल्याशिवाय दागिना खरेदी करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe