Gujarat : माजी सरपंचाने लग्नात पाडला पैशांचा पाऊस, भाच्याच्या लग्नात पाचशेच्या नोटांची केली मुक्त उधळण

Published on -

Gujarat : गुजरातमधील एका माजी सरपंचाच्या भाच्याच्या लग्नात पैशांचा पाऊस पडला गेला आहे. काही व्यक्ती घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा उधळताना दिसत आहेत. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या केकरी तालुक्यातील हा व्हिडिओ असल्याच सांगण्याच येत आहे.

या सोहळ्यादरम्यान घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा खाली उधळण्यात आल्या आहेत. लग्नाला आलेल्या पाहुण्यांची मात्र या नोटा गोळा करण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेकजण नोटा पकडण्यासाठी पळापळ करत आहेत.

पाहुण्यांना खूश करण्यासाठी पैशाचा पाऊस पाडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ पाहून नेटकरीही संतापले आहेत. हा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतात लग्न थाटामाटात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे लग्नामध्ये मोठा खर्चही केला जातो. मात्र आता अनेकदा असाच मिरवणुकीत देखील पैशाचा पाऊस पाडला जातो.

दरम्यान, लग्नसोहळा मोठ्या थाटा-माटात व्हावा असं सर्वांनाच वाटतं. अनेकदा यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी वेगळं केलं जातं यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले जातात. आता तर चक्क पैशांची उधळण केल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!