वारकरी संप्रदाय जातिभेद मानत नाही. वारकरी संप्रदायाने संत श्री शेख महंमद महाराज यांना स्वीकारले आहे. मंदिराचा दर्गा करू पाहणाऱ्या आमीन शेख याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तरी बरं झाले मोदींनी वक्फचे कंबरडे मोडले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलणार आहे.
मंदिर जीर्णोद्धारासाठी काय करायचे ते सांगा मंदिरासाठी सर्वात पुढे मी असेल, असे प्रतिपादन हभप संग्रामबापू भंडारे यांनी केले. संत श्री शेख महमंद महाराज मंदिर जीर्णोद्धार साठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून युवा कीर्तनकार हभप संग्रामबापू भंडारे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी बोलताना संग्राम भंडारे यांनी संत श्री शेख महमंद महाराज यांच्या मंदिराची वक्फकडे नोंदणी केली. सगळी मालमत्ता वक्फकडे वर्ग केली. मंदिराचा दर्गा केला. हे निंदनीय आहे.
वारकरी संप्रदाय पासून संत शेख महंमद महाराजांना लांब नेण्याचे काम करत असलेल्या शेख यांना सद्बुद्धि मिळावी. महाराजांचे भागवत धर्माचं काम आणि साहित्य, तत्वज्ञान पाहता त्यांचे आचरण हिंदू धर्माप्रमाणे होते. महाराज यांची संजीवन समाधी आहे.
ज्ञानोबा तुकोबा इतकेच संत शेख महमंद महाराज महत्त्वाचे आहेत. वेळ आली तर आपण मंदिरासाठी जीव देणार पण मंदीर उभे करणार सर्वात आधी मी पुढे असेल असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी साळुंके यांनी प्रास्ताविक केले. घनश्याम शेलार यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी मांडली. नाना कोथंबीरे यांनी आभार मानले.
गोपाळ मोटे पाटील यांनी मंदिराची माहिती दिली. अय्याज शेख यांनी मंदिरात स्वागत केले. यावेळी सतीश मखरे, सुदाम झुंजरुक, एकनाथ आळेकर आदीसह मोठ्या संख्येने गावकरी, तरुण उपस्थित होते.