सलमानला धमकवणाऱ्या बिश्नोई गँगचा मदतनीस अहमदनगरजवळून अटक, मोठे कनेक्शन समोर

Ahmednagarlive24 office
Published:
bishnoi

बिश्नोई गँग ही देशभर कुप्रसिद्ध असून प्रसिद्ध गायक सिद्धू मूसे वाला खूनप्रकरण व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकावल्यानंतर ही गॅंग जास्त चर्चेत आली. आता बिश्नोई गँगचे अहमदनगर जिल्ह्याशेजारील छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन घेऊन समोर आले आहे.

बिश्नोई टोळीसाठी रेकी करण्याची जबाबदारी वसीम चिकना यांच्याकडे देण्यात आली होती. ही माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी त्याला अहमदनगर जिल्ह्याशेजारील छत्रपती संभाजीनगर येथून वसिमला याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला वसीम हा जालना जिल्ह्यातील असून त्याचे छत्रपती संभाजीनगर शहराशी असलेले बिष्णोई टोळीचे कनेक्शन आता उघडकीस आले आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसे वाला खून प्रकरण, बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरात वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. देशभरात या टोळीची मोठी दहशत आहे. याच बिश्नोई याचे आता छत्रपती संभाजीनगर कनेक्शनमुळे समोर आलय. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा वसीम मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना हा लॉरेन्स बिश्नोईसाठी रेकी करत होता अशी माहीती समजली आहे.

सलमान खानच्या घरी रेकी करण्यासाठी त्याने या भागात रूम शोधण्याचे काम केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शहरातील जालानगर परिसरातील अलंकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याला पनवेल पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

सलमान खानला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस यंत्रणेला या प्रकरणाकडे लक्ष देऊन दोषींना शिक्षित करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. सलमान खान धमकी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, या गुन्हेगारांकडून वसीम चिकना चे नाव समोर आले होते.

ही सर्व माहिती समजताच पनवेल पोलिसांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधत पुढील कार्यवाही करण्याबाबत प्लँनिंग केले. त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या मदतीने जालानगर परिसरात कार्यवाही केली व वसीम चिकना याला ताब्यात घेतलेय. आता पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. यातून महत्त्वाचे अपडेट समोर येतील असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe