Maharashtra News : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्यासाठी रिझर्व्ह बँक गेल्या काही महिन्यांपासून मोहीम राबवत आहे. बँक ग्राहक बँकांच्या शाखेत जाऊन आपल्याकडील नोटा बदलून घेत आहेत. देशभरातून आतापर्यंत दोन हजार रुपये मूल्याच्या ८८ टक्के नोटा बँक प्रणालीमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे.
३१ जुलैपर्यंत २ हजार रुपये मूल्याच्या ३. १४ लाख नोटा बँकांमध्ये परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यामुळे आता चलनामध्ये २ हजार रुपयांच्या ठेवीत ४२ हजार नोटा असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-75.jpg)
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, १९ मे २०२३ रोजी बाजारात चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ८८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. ३१ मार्च २०२३ रोजी बाजारात ३.६२ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा चलनात होत्या. १९ मे २०२३ रोजी या नोटांचे परं घटून ३.५६ लाख कोटी रुपयांवर आले.
ठेव स्वरूपात ८७ टक्के परत
चलनातून परत मागवण्यात आलेल्या २,००० रुपये मूल्याच्या एकूण नोटांपैकी, सुमारे ८७ टक्के नोटा ठेवी स्वरूपात आल्या आणि उर्वरित सुमारे १३ टक्के इतर मूल्यांच्या बँक नोटांमध्ये बदलण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
दोन महिन्यांचा उपयोग करून घ्या
दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत कोणतीही गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी पुढील दोन महिन्यांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.