Retired IPS Officer | UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार IAS, IPS, IFS इत्यादी अनेक प्रतिष्ठित सेवांमध्ये निवडले जातात. यामध्ये IPS (Indian Police Service) ही ऑल इंडिया सर्व्हिस असून, या सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांना जबाबदारी आणि सन्मानासह भरघोस पगारही मिळतो. पण, अनेकांना प्रश्न असतो – IPS अधिकारी निवृत्त झाल्यावर त्यांना किती पेन्शन मिळते?
IPS अधिकाऱ्याचे निवृत्त वेतन
IPS अधिकाऱ्यांचा पे स्केल लेव्हल 10 पासून सुरू होतो. सेवेत वरिष्ठता व प्रमोशननुसार वेतन वाढत जाते. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचे वेतन 56,100 पासून 2,25,000 पर्यंत असते. यामध्ये अनेक भत्ते आणि सुविधा देखील समाविष्ट असतात.

नियमांनुसार, IPS अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या शेवटच्या बेसिक वेतनाच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळते. उदाहरणार्थ, जर निवृत्त होण्याच्या वेळी अधिकाऱ्याचे बेसिक वेतन 1,00,000 असेल, तर त्याला 50,000 पेन्शन मिळेल.
महागाई भत्ता मिळतो?
निवृत्त IPS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता देखील मिळतो का?, तर होय. या पेन्शनवर केंद्र सरकारने ठरवलेला महागाई भत्ता (DA) सुद्धा मिळतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA सुमारे 53% इतका आहे (एप्रिल 2025 स्थितीत). म्हणजेच जर निवृत्त अधिकाऱ्याचे बेसिक पेन्शन 50,000 असेल तर 53 टक्के महागाई भत्तानुसारची रक्कत होते 26,500 आणि हीच एकूण रक्कम होते तब्बल 76,500 प्रती महिना.
याशिवाय निवृत्त IPS अधिकाऱ्यांना केवळ पेन्शनच नव्हे तर काही ठराविक शासकीय सुविधा देखील मिळतात. यामध्ये वैद्यकीय सुविधा (CGHS), काही ठिकाणी सरकारी वाहन/ड्रायव्हर सुविधा, मानधन इ. लाभ मिळू शकतात.