HSC Exam Breaking News : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ! इथे वाचा बारावी परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक …

Published on -

HSC Exam Breaking News :- बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. बारावी परीक्षेच्या (HSC Exam) वेळापत्रकात (Timetable) आता बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी  यांनी दिली आहे. 

त्यामुळे पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही.

अलीकडेच संगमनेर जवळ चंदनापुरी घाटातील अपघातात प्रश्नपत्रिका नेणारे वाहन आगीत जळुन भस्मसात झाले आहे. यात असणाऱ्या हिंदी आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना ही घटना घडली होती.

भाषा (Language) विषयाच्या तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. दि. ५ व ७ मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, मात्र ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार दि. ५ व ७ एप्रिलला आता या विषयांचे पेपर (Paper) घेतले जाणार आहेत.

५ मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता ५ एप्रिलला होतील.

तर ७ मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, मात्र हे पेपर आता ७ एप्रिलला होतील.

तांत्रिक काही अडचणीमुळे हे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. येत्या ४ मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे.

बारावी परीक्षेचं बदलासंह संपूर्ण वेळापत्रक –

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!