२१ जानेवारी २०२५ मुंबई : युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये बहुप्रतीक्षित ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकचे अनावरण केले.ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये तिचे बोल्ड डिझाइन, अद्ययावत तंत्रज्ञान, अद्वितीय परफॉर्मन्स आणि संपूर्ण सुरक्षेसह इलेक्ट्रिक एसयूव्ही क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवला आहे.
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकच्या अनावरणाच्या निमित्ताने एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक अन्सू किम म्हणाले की, क्रेटा इलेक्ट्रिकने एचएमआयएलच्या विद्युतीकरणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा क्षण दिला असून, सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाप्रती आमची ही वचनबद्धता आहे.ही आमची पहिली भारतातच बनवलेली ईव्ही एसयूव्ही आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीतील जागतिक ज्ञानाचे एक दशक पूर्ण केलेल्या ह्युंदाई मोटर कंपनीने स्वतःला ईव्ही नावीन्यपूर्णतेतील आघाडीची कंपनी म्हणून प्रस्थापित केले आहे.हीच नावीन्यपूर्णता आणि ज्ञान यांचा वापर भारतात आणला जात असून, देशाच्या ईव्ही लँडस्केपमध्ये प्रवेश करत आहोत.
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ही मानवतेसाठी प्रगती या तत्त्वाचा भाग असून, अद्ययावत मोबिलिटी सोल्यूशन्सचे केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्याच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक भारतीय ईव्ही उद्योगात नवनवीन मानके स्थापित करेल तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल,अशी आम्हाला खात्री वाटत आहे.