Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त ‘मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत भाजप, शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो दाळ मिळणार आहे.
सर्वसामान्यांना दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसाला दिवाळी सण उत्साहात आनंदात साजरा करता येणार आहे,
असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र दिलीप गांधी यांनी केले. प्रेमदान हडको येथे दिवाळी सणानिमित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘मागेल त्याला दाळ’ योजनेतंर्गत ६० रुपये प्रति किलो दराने हरभरा दाळ वितरणाचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र दिलीप गांधी, नगरसेवक रवींद्र बारस्कर, उदय कराळे, सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार, मध्य मंडल अध्यक्ष राहुल जामगावकर, प्रशांत मुथा, पुष्कर कुलकर्णी, बाबासाहेब भिंगारदिवे, निलेश जाधव, पत्रकार सागर दुस्सल आदी उपस्थित होते.