Manoj jarange Patil : आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळालं असतं तर जगाच्या पाठिवर मराठा सगळ्यात श्रीमंत…

Ahmednagarlive24 office
Published:
Manoj jarange Patil

Manoj jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सुरु केलेला संघर्ष आता अंतिम टप्यात आहे, मराठ्यांच्या तरुणांना आयुष्याची भाकरी मिळून द्यायची आहे. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नसून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी (दि.२३) रोजी झालेल्या मराठा आरक्षणांच्या विराट सभेत ते बोलत होते. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे बालमटाकळी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्टी करत बालमटाकळी नगरीत स्वागत करण्यात आले.

जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, मराठ्यांनी इतरांना आरक्षण देताना कुणाला देऊ नका असा ‘ब्र’ शब्द कधी काढला नाही, उलट अडचणींच्या काळात अन्याय झालेल्या जातीचं रक्षण करण्यासाठी धावून गेला, एवढे सारे करत असताना मराठ्यांनी कधीच जात शोधली नाही.

कारण कधीकाळी हे आपल्या मदतीला धावून येतील, या भावनेतुन सगळ्यांना साथ दिली; परंतु आज परिस्थिती वेगळी आहे, मराठ्यांच्या बाजूने उभे न राहता त्यांना सगळ्या बाजुने घेरलं जात असल्याचा आरोप सरकारवर केला आहे. जिल्ह्यात सव्वातीन लाख नोंदी सापडल्या असून, राज्यात एकूण मराठा समाजाच्या ३२ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत.

याचा दीड ते दोन कोटी लोकांना लाभ मिळणार आहे. हेच आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळालं असतं तर जगाच्या पाठिवर मराठा सगळ्यात श्रीमंत आणि प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती.

भुजबळांचे नाव नं घेता ज्या माणसाने घटनेच्या पदावर बसून राज्याच पालकत्व स्वीकारलं आहे, तोच माणुस कायदा पायदळी तुडवत जातीजातीमध्ये तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य करत आहे, त्यामुळे जो लायक नाही, त्यांना महत्व देण्याची मराठ्यांना गरज नाही.

राज्यात ५५ टक्के मराठा असून, जमिनीचा बांद कोरला तर दोन पिढ्या बोलत नाही आणि हे आग्या मोहळ मागे लागले तर काय होईल, अशी खिल्ली उडवत छगन भुजबळ यांचा समाचार घेतला. आरक्षण मिळावं असं ओबीसीच्या काही नेत्यांना वाटतयं, त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे,

त्यामुळे मतभेद, जाळपोळ, आत्महत्या न करता शांततेत आंदोलन करा, १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु कराचे आहे, कारण २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांच्या पोरांसाठी गाफील राहू नये, असे त्यांनी सांगितले.

आरक्षण मिळावं अस ओबीसीच्या काही नेत्यांना वाटतयं, त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे, त्यामुळे मतभेद, जाळपोळ, आत्महत्या न करता शांततेत आंदोलन करा, दि. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करायचे आहे. कारण दि. २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांच्या पोरांसाठी गाफिल राहू नये, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe