‘शिंदे-फडणवीस म्हणजे काळू-बाळू तर, शहाजी पाटील सोंगाड्या…‘

Published on -

Maharashtra Politics : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे.

तर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यातील सोंगाड्या आहेत,’ अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंढरपूरमध्ये केली.

काय झाडी, काय डोंगार फेम शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसघांत राऊत यांची सभा झाली. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी पाटील यांच्यासह शिंदे-फडणवीस यांच्यावरही टीका केली.

ते म्हणाले, शिंदे आणि फडणवीस सरकारने मागील सरकारने घेतलेले लोकहिताचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. दुसरीकडे, हे सरकार काहीही निर्णय घेऊ लागले आहे.

राज्यात सध्या काळूबाळूचा तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आहे, एक बिनदाढीवाला. राष्ट्रगीतासाठी कसे उभे राहावे,, हे ज्यांना कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हे आपले दुर्दैव आहे.

आमदार पाटील हा मिमिक्री करणारा माणूस आहे. ज्यांना तमाशा काढायचा आहे, त्यांनी खुशाल त्याला तमाशात सोंगाड्या म्हणून घेऊन जावे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe