Indian Railways : रेल्वेत आरक्षित जागेवर उशिरा पोहचल्यास दुसऱ्यालाच जागा

Indian Railways

Indian Railways :  रेल्वेत आरक्षित जागेवर दहा मिनिटात पोहोचले नाही तर सीट दुसऱ्या प्रवाशाला जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाच्या या नव्या फतव्यामुळे मोठी गुंतागुंत वाढणार असून प्रवासी संघटनेने त्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

रेल्वेमध्ये तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर त्या जागेवर अवघ्या दहा मिनिटांतच ताबा घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. जर प्रवासी त्या सीटवर बसण्यासाठी आला नाही तर अन्य प्रवाशांना सीटची विक्री करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रवासी पुढील रेल्वे स्थानकापर्यंत आरक्षित जागेवर आला तरीही त्याला सीट मिळत होती. आता मात्र हा नवीन नियम आणला गेला आहे.

यापूर्वी काय व्हायचे ?

प्रवाशांनी ज्या रेल्वे स्थानकावर आरक्षण केले आहे, त्या रेल्वे स्थानकापासून पुढील रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशाला आरक्षित जागेवर येऊन बसण्याची मुभा होती. त्यामुळे तो त्या जागेवर हक्क सांगू शकत होता. अनेक प्रवासी हे पुढच्या रेल्वे स्थानकावरून प्रवासाला बसत होते.

दहा मिनिटांत आरक्षित जागेचा ताबा गरजेचा

■ ज्या रेल्वे स्थानकावरून आरक्षण असेल तिथून अवघ्या दहा मिनिटांत आरक्षित सीटवर बसणे आता गरजेचे आहे.

■ प्रवाशांनी जर तसे केले नाही तर तो गैरहजर असल्याचे गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर हे आरक्षण दुसऱ्या प्रवाशाला दिले जाऊ शकेल

मशीनवर उपस्थिती नोंदवणार

रेल्वेतील आरक्षणाच्या नोंदी आता ऑनलाइन आहेत. टीसींनादेखील मशीन देण्यात आले आहे. टीसी चालत्या रेल्वेत आरक्षित जागेवर संबंधित प्रवासी आल की नाही याची खात्री करून घेईल. जर तो गैरहजर असेल तर अन्य प्रवाशाला जागा देण्यात येईल.

एखादा प्रवासी रेल्वेचे आरक्षण करतोय याचाच अर्थ त्याला ती जागा बहाल करण्यात येते. आरक्षण हा एक प्रकारे करार असून ते सीट अन्य प्रवाशाला देणे बेकायदा ठरेल. प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी होते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe