Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर…

Ahilyanagarlive24 office
Published:

Love Jihad : राज्यात व नगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ही कीड नष्ट करायची असेल तर उंबरे गावातील घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. यासाठी पैसा कोण पुरवतो, व्यक्ती कोण, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

सोमवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद लाड, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत उंबरे गावात बैठक पार पडली. आरोपी विरोधात एनपीडीएअंतर्गत कारवाई करा.

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व धर्मीय समिती तयार करा. सर्व माहिती मिळाल्यावरच कारवाई करा. त्या हिंदू समाजाच्या निष्पाप तरुणांना सोडून द्या, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, झेडपीचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, दिलीप भालसिंग, बाबुशेठ टायरवाले, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी आदिनाथ महाराज दुशिंग यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली.

राहुरीतील उंबरे गावात घडलेली घटना निंदनीय आहे. तुमच्या आमच्या लेकीची संरक्षण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आम्ही कमजोर नाहीत हेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आता भविष्यात उंबरे गावात एक जरी घटना घडली तर राजकारण सोडून देईल, असे मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले.

राज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शांत राहाणे आपला कमकुवतपणा नाही. कुणाचा गैरसमज असल्यास वेळ आल्यावर गैरसमज दूर केला जाईल, असा सज्जड इशारा पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिला.

हिंदू समाजातील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेल्या हिंदू संघटनेच्या सदस्यांची एवढी मोठी यादी अटक करण्यासाठी कोणी दिली. याची चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री विखे-पाटील, माजी आमदार कर्डिले यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe