Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठी भीषण बनली आहे. शहरात सध्या स्थितीला वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे निगडी पर्यंत मेट्रोमार्ग विकसित केला जाणार आहे. दरम्यान आता निगडीच्या पुढेही मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार असे दिसते. देहूरोड ते निगडी पर्यंत मेट्रो मार्ग विकसित व्हावा यासाठी आता मागणी जोर धरत आहे.
अजित पवार गटाचे देहूरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बंसल यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांना निगडी ते देहू रोड असा मेट्रो मार्ग विकसित करावा यासाठी एक निवेदन सादर केले आहे. देहूगाव हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
या ठिकाणी महाराष्ट्रासहित देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे वर्षातून तीनदा यात्रेचे आयोजन होते आणि या निमित्ताने येथे लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी हजेरी लावत असतात.
याच अनुषंगाने आता देहूगावाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. देहूरोड ते निगडी असा मेट्रो मार्ग विकसित करावा अशी मागणी होत आहे. यासाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा देखील होऊ लागला आहे.
नक्कीच देहूरोड ते निगडी या दरम्यान मेट्रो सुरु झाली तर रस्त्यांवरील वाहतुकीचा बऱ्यापैकी कमी होणार आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर या मेट्रो मार्गामुळे प्रदूषणाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
यामुळे आता शासनाच्या माध्यमातून देहूरोड ते निगडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जातो का, शासन या मागणीवर नेमका काय निर्णय घेते? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. मेट्रोमुळे शहराचा सर्वसमावेशक विकास होणार आहे.
त्यामुळे, शहरातील महत्त्वाचे भाग मेट्रो ने जोडण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रोचे काम सुरू असून येत्या काही दिवसात हा प्रकल्प देखील पूर्ण होणार आहे.
दुसरीकडे आता देहूरोडपर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खरेतर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भक्ती शक्ती चौकापासून फक्त अडीच किमी अंतरावर असणाऱ्या देहूरोडपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यात यावा, अशी या भागातील प्रवाशांची मागणी आहे. देहू रोड पर्यंत मेट्रो सुरू झाली तर याचा सर्व प्रवाशांना आणि परिसराला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
त्यामुळे देहूरोड पर्यंत मेट्रो करावी, अशी मागणी आमदार शेळके यांच्याकडे आशिष बन्सल यांनी केली आहे. यामुळे आता आमदार शेळके या मागणीवर काय निर्णय घेतात आणि शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.