शालेय कामकाजाच्या २३४ दिवसांची निश्चिती झाल्यानंतर शालेय वेळापत्रक सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद करून देण्यात आले आहे. यानुसार आता राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये प्रस्तावित वेळापत्रक व तासिका यांचे नियोजन देताना सकाळी ९ ते दुपारी ३.५५ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती समजली आहे.
सकाळी ९ ला शाळा भरल्यानंतर ९ ते ९.२५ या कालावधीमध्ये परिपाठाचे नियोजन अपेक्षित आहेत. त्यानंतर ११.२५ पर्यंत पहिल्या तीन तासीका पूर्ण होतील, त्यानंतर दहा मिनिटांची छोटी सुट्टी असेल. ११.३५ ला तासिका सुरू होऊन बारा पन्नासपर्यंत दोन तासिका पूर्ण होतील.

त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी असेल. दुपारी दीड वाजता शाळा भरल्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत तीन तासिका पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रस्तावित वेळापत्रकात प्रत्येक तासानंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नववी-दहावीच्या वर्गासाठी शेवटची तासिका ३.५५ ला संपणार आहे.
अशा पद्धतीचे नसून वेळापत्रक अशी माहिती समजली आहे. शालेय कामकाजाच्या २३४ दिवसांची निश्चिती झाल्यानंतर शालेय वेळापत्रक सुद्धा राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद करून देण्यात आले आहे. त्यानुसार वर्षभरात तिसरी ते पाचवी या पूर्वतयारी गटासाठीचे विविध विषयांचे १ हजार ८७२ तासिका कामकाज चालेल, तर १ हजार ९२ घड्याळी तास कामकाज होणार आहे.
सहावी ते आठवीसाठी १ हजार ८७२ तासिकांचे अध्यापन वर्षभरात होणार आहे. नववी ते दहावीसाठी १ हजार ६३८ तासिका निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन वेळापत्रकाचा विचार करता दहा मिनिटांची एक व चाळीस मिनिटांची एक अशा दोन सुट्ट्या दिवसभरात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा यांच्यासाठी वर्षभरात प्रत्येकी २३४ तासिका राखीव असणार आहेत.
सरासरी प्रत्येक भाषेसाठी १३७घड्याळी तास भाषेचे अध्यापन होणार आहे. सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमाच्या तासिकांमध्ये प्रथम भाषेसाठी सर्वाधिक तास आहेत, मात्र सध्याच्या आराखड्यात प्रत्येक भाषेसाठी समान तासिका स्वीकारण्यात आल्या आहेत. गणित विषयांसाठी प्रत्येकी ३१२ तासिका व वर्षभरात १८२ तास उपलब्ध असणार आहेत. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण यासाठी १५६ तासिका असून सरासरी प्रत्येकी ९१ घड्याळी तास अध्यापन होणार आहे.