महत्वाचे! एक जानेवारी पासून न्यायालयात ई-फायलिंग सुरु करणार.

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने न्यायालयात ई-फायलिंग (E-filing) सुरु करण्याचा आदेश आला आहे. न्यायालयात लवकरच ई फायलिंग सुविधासुरु केले जाईल.

अशी माहिती प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली.(Corona third wave) जिल्हा न्यायालयामधील वकिलांच्या संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते केले.

या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष ॲड. संदीप वांढेकर, सचिव ॲड. स्वाती नगरकर, खजिनदार ॲड. अविनाश बुधवंत यांच्यासहित पदाधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.

बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. अनिल सरोदे म्हणाले, नवीन वर्षाची सुरूवात चांगली व्हावी, यासाठी पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याचा संघटनेचा मनोदय होता.

वर्षभराच्या दिवसाचे नियोजन ठरविताना कामकाज सुटसुटीत होण्यासाठी उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या सर्व सुट्या व स्थानिक सुट्या या दिनदर्शिकेत अधोरेखित केल्या आहेत.

यांना मिळाली पदोन्नती…

जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश आर. डी. चव्हाण, मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. ए. तिवारी या न्याधीशांना पदोन्नती मिळाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. ॲड. शाम असावा यांची शासनाच्या लोक आयुक्त समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe