कापूस दरात वाढ; तर फरदड कापसाचे ही होत आहेत पैसे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- यंदा कापसाला चांगली मागणी असल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून भाव टिकून आहेत. मात्र आता मुख्य पिकाची आवक घटली असून बाजारातील वाढती मागणी पहाता सध्या फरदडला ही चांगला भाव मिळत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते.

तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात अधिक उत्पादन घेण्याचे ठरवले. त्यात पाणीसाठा मुबलक असल्याकारणाने कापूस मोडणीपेक्षा त्याची जोपासना केली तर आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत आहे.

तीन ते चार वेचण्या पूर्ण झाल्यानंतरही कापूस शेतामध्ये ठेऊन पाणी देऊन कापसाचे उत्पादन घेतले जाते. फरदड कापूस म्हणजे हंगाम संपूनही अधिकच्या उत्पादनासाठी कापसाला पाणी देऊन उत्पादन घेणे.

यामुळे शेतकऱ्यांचे कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. यंदा हंगामात 11 हजारचा विक्रमी दर कापसाला मिळाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात कापूस हा 10 हजार 700 रुपयांवर स्थिरावलेला आहे.

तर हेच भाव फरदड कापसालाही 10 हजार 500 पर्यंतचा भाव परभणी कृषी उत्पन्न मिळत आहे. कापसाला बाजारात अधिकची मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचा विचार न करता उपलब्ध फरदड कापसाला ही अधिकचा भाव मिळत आहे. पण कापसाचे पीक हे अधिक काळ शेतामध्ये राहिल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्या धोका असतो.

या बोंडअळीमुळे इतर पीकेही प्रभावित होतात. एकंदरीत रब्बी हंगामातील पिकांवरही या किडीचा प्रादुर्भाव होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe