भारतात पहिल्या GenBeta बाळाला मिळालं आधार कार्ड, काय आहे ऑनलाइन प्रोसेस?

UIDAI ने भारतातील पहिल्या GenBeta मुलाला आधार कार्ड दिले असून, आता तुम्हीही लहान मुलासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी काय प्रोसेस असणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Published on -

Blue Aadhaar Card | भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीतील एक मोठी घडामोड म्हणजे देशातील पहिल्या GenBeta मुलाला आधार कार्ड मिळालं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचं Twitter) अकाउंटवर याची माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की “भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला त्याचे Aadhaar मिळाले! आधार सर्वांसाठी आहे.” यामुळे लहान मुलांसाठी ‘निळा आधार कार्ड’ म्हणजेच बाल आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बाल आधार कार्ड ही वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जारी केले जाणारे ओळखपत्र आहे. हे कार्ड निळ्या रंगात असते आणि त्यात कोणतेही बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅन) आवश्यक नसतात. मात्र मुलाचं वय 5 वर्षांनंतर झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

यासाठी आई-वडिलांचे आधार कार्ड, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा (उदाहरणार्थ – वीज बिल, बँक स्टेटमेंट), मोबाईल नंबर आणि मुलाचा अलीकडील फोटो असणे आवश्यक आहे.

मात्र, मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी त्याचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच भारताचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन प्रक्रिया

जर तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात जायचं नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून अपॉइंटमेंट बुक करून घरी बसून ही प्रक्रिया सुरू करता येते:

1. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा
2. राज्य आणि जिल्हा निवडा
3. जवळचे आधार केंद्र निवडा
4. अपॉइंटमेंट बुक करा
5. तुमचा मोबाइल नंबर एंटर करा
6. OTP टाकून अपॉइंटमेंट कन्फर्म करा
7. दिलेल्या वेळेनुसार केंद्रावर जाऊन मुलाचा आधार नोंद करा

डाउनलोड करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा . त्यानंतर आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडी टाका . पुढे कॅप्चा कोड भरून OTP मागवा. OTP टाकून डाउनलोड पर्यायावर क्लिक करा आणि PDF स्वरूपात आधार कार्ड सेव्ह करा

ही प्रक्रिया अगदी सोपी असून, लहान मुलांसाठी ओळखपत्र तयार ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भविष्यातील शैक्षणिक, आरोग्य किंवा इतर सरकारी योजनांसाठी बाल आधार उपयुक्त ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News