इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत, आता यांनी केली तक्रार

Published on -

Maharashtra news : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर पुन्हा अडचणीत आले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी दिव्यांगांसंबंधी वक्तव्य केले होते.

याप्रकरणी पुण्यात दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यावरून आयुक्तांनी अकोल्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केल्या आहेत.अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते.

तेथे बोलताना ‘माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील.’ असे इंदुरीकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यासंबंधी पुण्यातील राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे इंदुरीकर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी दखल घेत पोलिसांना पत्र पाठविले आहे.

तक्रारीत तथ्य आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे दिव्यांग आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांना पुन्हा एका नव्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News