Railways Decision : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय ! आता पुन्हा मास्क घालणे अनिवार्य होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railways Decision : कोरोनाच्या (Corona) वाढत्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने (railway administration) कडक पाऊले उचलत पुन्हा प्रवासादरम्यान मास्क (Mask) घालणे अनिवार्य करणार आहे. कारण सध्या राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक (Worrying) आहे.

यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत सर्वात मोठा निर्णय (Big decision) घेण्यात आला असून, आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पुनरागमन होत आहे. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता, रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना मास्क (Masks) घालणे पुन्हा अनिवार्य केले आहे.

याबाबत रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (प्रवासी) नीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत रेल्वेमध्ये प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे.

तसेच मास्क न लावणाऱ्यांवर तर कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

त्याचसोबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने २२ मार्च रोजी कोविड संदर्भात जारी केलेल्या SOP चे पालन केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.