Health News : तीन वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही परजीवी रोगविरोधी लस विकसित केली नव्हती. मात्र आता मलेरियाविरोधी दोन लसी आल्या आहेत, ज्यांची नावे आरटीएस, एस आणि आर-२१ आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि आर २१ लसीचे प्रमुख अन्वेषक एड्रियन हिल यांनी मलेरिया नियंत्रणासाठी हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले आहे.
मलेरिया सुमारे ३० दशलक्ष म्हणजेच जवळपास तीनशे कोटी वर्षांपासून अस्तित्वात असून त्यावेळी मानव प्राणी अस्तित्वातही नव्हता. मलेरिया हा विषाणू किंवा जीवाणू नाही. हा एक ‘प्रोटोझोअन’ (प्राथमिक) परजीवी आहे, जो सामान्य विषाणूपेक्षा हजारो पटीने मोठा आहे.
जनुकांची तुलना करून हे अधिक चांगले समजू शकते. उदाहरणार्थ, कोविड-१९ विषाणूमध्ये सुमारे १२ जनुके आहेत, त्या तुलनेत मलेरियामध्ये जास्त जनुके आहेत. याव्यतिरिक्त, मलेरिया परजीवी चार जीवन चक्रांमधून जातो. वैद्यकीय संशोधक शंभर वर्षांहून अधिक काळ मलेरियाची लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऑक्सफर्डमध्ये या संशोधनासाठी तब्बल ३० वर्षे लागल्याचे एड्रियन हिल यांनी सांगितले.
मलेरियाचे चार जीवनचक्र खूप भिन्न आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रतिजनांची आवश्यकता असते. ‘अँटीबॉडीज’ तयार करण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करणारा पदार्थ म्हणजे अँटिजेन संशोधकांनी स्पोरोझोइट्स’ (पेशींचे एक रूप) पाहिले.
जे डास त्वचेच्या चाव्यांद्वारे मानवी शरीरात सोडतात. या पेशी यकृतापर्यंत पोहोचण्यापूर्वी संशोधन पथकाने ते शोधण्याचे काम केले. या पेशी वेगाने वाढतात आणि जास्त काळ जगतात. प्रत्येक डास त्वचेमध्ये थोड्या प्रमाणात स्पोरोझोइट्स सोडतो, कदाचित हे प्रमाण २० स्पोरोझोइट्स इतके असू शकते.
परंतु जर शरीर २० ‘स्पोरोझोइट्स’ सहन करीत असेल तर संबधित व्यक्ती सुरक्षित राहत असल्याचे मानले जाते. पण एकही ‘स्पोरोझोइट’ पुढे सरकला, तर जीवनासाठी समस्या निर्माण होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मानवी शरीरात ‘स्पोरोझोइट’ नष्ट करण्यासाठी केवळ काही मिनिटांचा कालावधी मिळतो.
त्यामुळे अपवादात्मकपणे उच्च पातळीच्या अँटीबॉडीजची आवश्यकता भासते. त्याचा सामना परजीवीला यापूर्वी कधीही झाला नसेल आणि त्यांना कसे सामोरे जावे हे माहीत नाही. परंतु असे म्हणता येईल की, अँटीबॉडी एखाद्या कारसारखी असावी, जी इतर कारच्या तुलनेत १० पट वेगाने धावू शकते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंजूर झाल्यापासून आर-२१ लस विकसित करण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागल्याने संशोधकांचे पथक निराश झाले होते. आर-२१ चे लाखो डोस भारतात साठवले गेले आहेत.
त्या तुलनेत, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका अँटी-कोविड-१९ लसींना २०२० मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मान्यता देण्यात आली आणि पुढच्या आठवड्यातच अनेक देशांमध्ये त्यांचा वापर लगेच सुरू झाला. त्यावर्षी आफ्रिकेत कोविड-१९पेक्षा मलेरियामुळे जास्त मृत्यू झाले.