Investment Tips: एसआयपीत गुंतवणूक करून दुपटीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर करा ‘हे’ काम! गुंतवणुकीपेक्षा तिप्पट मिळेल पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips:- सध्या लोकप्रिय असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना व त्यासोबत म्युच्युअल फंड एसआयपी इत्यादी पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. कारण गुंतवणूक करताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि हमी परतावा या गोष्टींना खूप महत्त्व असते व या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूकदार गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात.

परंतु गेल्या काही वर्षांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. साधारणपणे 12 टक्क्यांनी आपल्याला एसआयपीतून परतावा मिळतो. तसेच यामध्ये जर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करत राहिले तर चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील मिळतो. परंतु तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करून जर दुप्पट किंवा तिप्पट नफा हवा असेल तर तुम्ही गुंतवणूक करताना टॉप अपचा पर्याय वापरणे फायद्याचे ठरते. कारण यामुळे तुम्हाला मिळणारा परताव्यात वाढ होऊ शकते.

 टॉप अप एसआयपी म्हणजे नेमके काय?

जेव्हा आपण एसआयपी सुरू करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एका ठराविक तारखेला रक्कम ही एसआयपी जमा करावी लागते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमची एसआयपी जर प्रति महिना दोन हजार रुपयाची असेल तर तुम्हाला किती वर्ष एसआयपी गुंतवणूक केली तरी दोन हजार रुपये भरावे लागतात.

परंतु तुम्ही जर टॉप अप एसआयपी चा पर्याय निवडला तर यामध्ये तुम्ही नियमितपणे प्रत्येक महिन्याला जी रक्कम भरत आहात त्यामध्ये काही जास्तीची रक्कम जोडणे याला टॉप अप एसआयपी म्हणतात. हा मुद्दा जर उदाहरणांनी समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही दोन हजार रुपयांची एसआयपी करत असाल तर प्रत्येक वर्षाला यामध्ये काही अतिरिक्त रक्कम टाकणे म्हणजेच टॉप अप एसआयपी होय.

 प्रत्येक वर्षाला दहा टक्क्यांची टॉप अप एसआयपी केल्यावर काय फायदा होतो?

समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची एसआयपी करत आहात व प्रत्येक वर्षाला या एसआयपीमध्ये दहा टक्क्यांची वाढ करायचे तुम्ही ठरवले. यामध्ये पहिल्या वर्षी दोन हजार रुपयांची एसआयपी केली तर दुसऱ्या वर्षी 2200 रुपयांची एसआयपी तुम्हाला करावी लागेल. दुसऱ्या वर्षात दहा टक्क्यांनी परत वाढ करावे लागेल.

जर तुम्ही जितक्या कालावधी करता एसआयपी करत राहाल तितक्या प्रत्येक वर्षाला तुम्ही त्यात दहा टक्क्यांनी वाढ करावी लागेल. म्हणजेच तुम्ही एसआयपीमध्ये दहा टक्क्यांच्या टॉप-अपने वाढ केली व ही रक्कम सतत पंधरा वर्षे भरत राहिले तर तुमचे एकूण सात लाख 62 हजार 540 रुपये जमा होतील व त्यावर तुम्हाला नऊ लाख 74 हजार 230 रुपयांचे व्याज मिळेल. पंधरा वर्षात तुम्हाला 17 लाख 36 हजार 770 रुपये मिळतील.