सध्या मोठ्या प्रमाणावर सोलर ऊर्जेचा वापर वाढताना आपल्याला दिसून येत आहे व यामुळे विज बिलाच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यास देखील मदत होणार आहे. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात सौर ऊर्जेचा वापर खूप महत्त्वाचा ठरणार आहे व त्याकरिता सरकारच्या माध्यमातून देखील सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये देखील सौर पॅनल किंवा सोलर सिस्टम खरेदीवर अनुदान दिले जाते. या अनुषंगाने तुम्हाला देखील घराच्या छतावर सौर पॅनल बसवायचा असेल तर तुम्ही टाटा पावर सोलरचा 2kW क्षमतेचा सोलर सिस्टम बसू शकतात. ही सोलर सिस्टम तुमच्या घरातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे व विशेष म्हणजे अनुदान देखील यावर मिळते.
काय आहेत टाटाच्या 2kW सोलर सिस्टमची वैशिष्ट्ये?
1) या माध्यमातून तुम्ही दररोज आठ ते दहा युनिट विजेची निर्मिती करू शकतात.
2) टाटा सोलर 25 वर्षापर्यंत यावर वारंटी देते.
3) टाटाच्या या सोलर सिस्टमसाठी कमी मेंटेनन्स खर्च येतो व ती दीर्घकाळ टिकते.
4) तसेच टाटा सोलर पावर ही एक विश्वासहार्य कंपनी आहे व 25 ते 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे.
टाटाची 2kW सोलर सिस्टम बसवण्यासाठी लागणारा एकूण खर्च आणि मिळणारे अनुदान
टाटाच्या 2kW सोलर सिस्टमची एकूण किंमत तुम्हारे एक लाख वीस हजार रुपये आहे. परंतु तुम्हाला केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 60 हजार रुपयांचे अनुदान यावर मिळते. या योजनेतून मिळालेल्या अनुदानानंतर तुम्हाला फक्त 48 हजार रुपये खर्च यावर करावा लागतो. तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वेगवेगळे अनुदान यावर घेऊ शकतात. राज्यानुसार मिळणाऱ्या अनुदानाचे दर वेगवेगळ्या असून यामध्ये तुम्हाला पंधरा टक्क्यांपासून ते 30 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. अशा पद्धतीने सगळे मिळून तुम्हाला सरकारकडून 75% पर्यंत अनुदान मिळते. म्हणजेच तुम्हाला 25% यावर खर्च करावा लागतो व साधारणपणे तीस हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात.
महत्वाची बाब म्हणजे तुमच्या घराचा विजेचा वापर 2kW सोलर सिस्टम पासून निर्माण होणाऱ्या विजेपेक्षा कमी असेल तर तुम्ही उरणारी अतिरिक्त वीज जवळच्या पावर ग्रीडला विकून पैसा मिळवू शकता. अशापद्धतीने तुमचा सोलर सिस्टम बसवण्याचा खर्च दोन ते तीन वर्षात भरून निघतो त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर मोफत वीज मिळते. टाटा पावरची 2kW सोलर सिस्टम हा एक फायदेशीर पर्याय असून सरकारी अनुदानंतर त्याची किंमत तीस हजार पर्यंत खाली येते. त्यामुळे आपण आरामात ही सोलर सिस्टम पासून विजेच्या समस्या पासून मुक्तता मिळवू शकतो.
अनुदानासाठी असा करावा अर्ज?
1) पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmsuryaghar.gov.in/ ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
2) त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच विज बिल इत्यादी ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावे लागते.
3) अर्ज केल्यानंतर एकदा व्यवहार्यता मंजूर झाल्यानंतर सरकार मान्यताप्राप्त विक्रेत्याची टीम तुमच्या घरी येऊन सोलर सिस्टम इन्स्टॉल करते.
4) सोलर सिस्टम बसवल्यानंतर सरकारकडून तुम्हाला तीस दिवसांच्या आत अनुदानाची रक्कम दिली जाते.