Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : ‘तोरणमाळ’ येथील तलावाचे नाव खालील पैकी कोणते आहे?
उत्तर : यशवंतराव हे तोरणमाळ येथील तलावाचे नाव आहे.
प्रश्न : ‘दूध सागर’ हा धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : गोवा या राज्यात दूध सागर’ हा धबधबा आहे.
प्रश्न : ‘सागा दावा’ हा कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे?
उत्तर : सिक्कीम या राज्यातील प्रमुख सण आहे.
प्रश्न : रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची काय म्हटली जाते?
उत्तर : जीवन रेखा
प्रश्न : सर्वात पहिला गणेश उत्सव कोणत्या ठिकाणी सुरु झाला होता?
उत्तर : पुणे या ठिकाणी सर्वात पहिला गणेश उत्सव सुरु झाला.
प्रश्न : मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदान संघाची मागणी कोणी केली होती?
उत्तर : बेरिस्टर जीना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदान संघाची मागणी केली होती.
प्रश्न : सस्पेंड केलेल्या अधिकाऱ्याला किती वेतन दिले जाते?
उत्तर : 50 टक्के वेतन दिले जाते.