Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/04/ahmednagarlive24-gk.jpg)
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : महाराष्टात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
उत्तर : पुणे
प्रश्न : भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे?
उत्तर : आर्यभट्ट असे भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे.
प्रश्न : उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेत एकूण किती जागा आहेत?
उत्तर : १०० जागा
प्रश्न : राजगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
उत्तर : पुणे जिल्हा
प्रश्न : भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे?
उत्तर : २५ उच्च न्यायालय भारतात आहेत.
प्रश्न : सिंहाच्या ओरडण्याचा आवाज किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो?
उत्तर : ८ किलोमीटर पर्यंत सिंहाच्या ओरडण्याचा आवाज जातो.
प्रश्न : ‘HELMET’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर :
H – Head (डोके)
E – Ear (कान)
L – Lips (ओठ)
M – Mouth (तोंड)
E – Eyes (डोळे)
T – Teeth (दात)