Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न: गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरू मानत होते?
उत्तर- गोपाळकृष्ण गोखले
प्रश्न: आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा कोणता भाग जबाबदार आहे?
उत्तर- सुरक्षा परिषद
प्रश्न: भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना कोणता आहे?
उत्तर- चैत्र
प्रश्न: फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर- इथिलीन
प्रश्न: कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे?
उत्तर- स्टेम
प्रश्न: संगणकाचा जनक कोणाला म्हणतात?
उत्तर- चार्ल्स बॅबेज
प्रश्न: अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती कोण होती?
उत्तर- युरी गागारिन (रशिया)
प्रश्न: दुर्बिणीचा शोध कोणी लावला?
उत्तर- गॅलिलिओ
प्रश्न: भारतात पहिली ट्रेन किती कोणत्या ठिकाणापर्यंत धावली?
उत्तर- कोलकाता
प्रश्न : असा कोणता कुत्रा आहे जो माणसाला चावत नाही पण माणूस त्याला चावतो?
उत्तर – हॉट डॉग