Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न- भारतातील सर्वांत लांबीची द्वीपकल्पीय नदी, जिला वृद्ध गंगा म्हणतात, ती कोणती?
उत्तर – गोदावरी नदी वृद्ध गंगा म्हणूनही ओळखली जाते.
प्रश्न- भारतात सर्वाधिक काजूचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं?
उत्तर- केरळमध्ये काजूचं सर्वाधिक उत्पादन होतं.
प्रश्न- जगात सर्वांत आधी चलनी नोट कोणत्या देशात छापण्यात आली होती?
उत्तर – जगात सर्वांत आधी चलनी नोट चीनमध्ये छापण्यात आली होती.
प्रश्न- भारतातील पहिल्या स्वदेशी कम्प्युटरचं नाव काय होतं?
उत्तर – भारतातील पहिल्या स्वदेशी कम्प्युटरचं नाव सिद्धार्थ होतं.
प्रश्न- जगभरात सोन्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता?
उत्तर- चीन हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे.
प्रश्न- भारतातील कोणतं राज्य ‘स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाते?
उत्तर – गुजरात राज्य ‘स्लीपिंग स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जातं.
प्रश्न- भारतातील कोणत्या राज्याला मसाल्यांची बाग म्हणतात?
उत्तर – केरळ राज्याला मसाल्यांची बाग म्हणतात.
प्रश्न- भारतातील पहिले ‘डार्क नाईट स्काय रिझर्व्ह’ कुठे बांधले जाईल?
उत्तर – भारतातील पहिले ‘डार्क नाईट स्काय रिझर्व्ह’ लडाखमध्ये बांधलं जाणार आहे.
प्रश्न- अलीकडेच वन-डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक रन्स करणारा सहावा फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर – वन-डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक रन्स करणारा सहावा फलंदाज रोहित शर्मा आहे.
प्रश्न – एक दिवसासाठी उत्तर प्रदेशची राजधानी बनलेलं शहर कोणतं आहे?
उत्तर – एक दिवसासाठी उत्तर प्रदेशची राजधानी बनलेलं शहर अलाहाबाद होय.
प्रश्न – भारतातील अशी कोणती जत्रा आहे जी अंतराळातूनही दिसते?
उत्तर – ‘कुंभमेळा’ हा अंतराळातूनही पाहिला जाऊ शकतो.