तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, त्यांच्या टार्गेटवर शरद पवार; संजय राऊतांच्या खळबळजनक दावा

Published on -

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणांच्या (ED) बाबतीत एक दावा केला आहे. यामध्ये त्यांनी तपास यंत्रणांना टार्गेट दिले जाते, असा खळबळजनक दावा केला आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केलाय. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवारांसह (Sharad Pawar) महाविकास आघाडीचे नेते असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपवर (Bjp) सडकून टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावरनिशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे.

मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही, असा खोटक टोलाही संजय राऊतांनी पंतप्रधानांना यावेळी लगावला आहे.

दरम्यान, भाजपनं विजय मिळवलेल्या उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यांतील विजयाचा उन्माद मांडून नये, असं सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

तसेच गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe