FASTag वापरकर्त्यांसाठी कामाची बातमी ! ‘हे’ काम केले नाही तर फास्टॅग, सोबतच मोठा दंडही भरावा लागणार

Ahmednagarlive24 office
Published:

Fastag Rules : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या कामात मोठी प्रगती झाली आहे. आता देशातील विविध भागांमधील रस्ते चकाचक झाले आहेत. एवढेच नाही तर टोल आकारणी संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी फास्टॅग सारख नवीन तंत्रज्ञान देखील आलं आहे. यामुळे टोल आकारण्यासाठी आता कारचालकांना, वाहन चालकांना टोलवर अधिक वेळ थांबावे लागत नाही.

विशेष म्हणजे या नवीन तंत्रज्ञानामुळे आता वाहन चालकांचे पैसे देखील वाचू लागले आहेत. फास्टॅग स्कॅन करून थेट अकाउंट मधून पैसे कपात केले जात आहेत. भारतात नव्याने दाखल झालेल्या या तंत्रज्ञानामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान याच फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फास्टॅगसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. जे वापरकर्ते ही केवायसी करणार नाहीत त्यांचे फास्टॅग बंद केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही केवायसी करण्यासाठी वापर करताना 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्यांनी केवायसी केलेली नसेल त्यांचे फास्टॅग बंद केले जाईल आणि ब्लॉक केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत हे काम करावे लागणार आहे. नाहीतर कारचालकांना, वाहनचालकांना अतिरिक्त टोल भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आता आपण फास्टॅग केवायसी कशी करायची यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऑनलाइन केवायसी कशी करणार ?

यासाठी फास्टॅगच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://fastag.ihmcl.com/ या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर लॉगिन घ्यावे लागणार आहे. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरचा वापर करावा लागणार आहे.

साइटवर तुम्ही एकदा की लॉगिन घेतली तिथे तुम्हाला तुमच्या माय प्रोफाईलवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला केवायसी या पर्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कस्टमर टाईप हा ऑप्शन निवडून विचारलेली सर्व माहिती भरा. येथे तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

ऑफलाइन केवायसी कशी करणार

तुमच्याकडे ज्या बँकेचे फास्टॅग आहे त्या बँकेच्या शाखेत भेट द्या. तिथे गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना फास्टॅग केवायसीसाठी विनंती करा आणि त्यानंतर तुम्हाला यासाठीचा अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच अर्जासोबत तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत.

कोण-कोणती कागदपत्रे लागतात

अर्जदाराचे पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे यासाठी आवश्यक असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe