१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : किया इंडिया या ऑटोमेकरने आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्यासह मध्यम व कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये नवीन एसयूव्ही न सेगमेंट दाखल केला आहे.कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही ९ व कार्निव्हलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण 5 आहे, जे भारतातील ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्व देत आहे.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर जून्सू चो म्हणाले, भारतात विशेषतः व्हेईकल्सकडून अधिक अपेक्षा करणारे तरुण, तंत्रज्ञानप्रेमी व साहसी ड्रायव्हर्समध्ये एसयूव्हीप्रति मागणी वाढत आहे.या विकसित होत असलेल्या प्राधान्यक्रमांशी बांधील राहत किया इंडिया नावीन्यता आणि ग्राहक केंद्रित डिझाइनच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह उद्योगामध्ये शक्य असलेल्या मर्यादांना दूर करत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/4.jpg)
किया सिरॉस आमच्या पोर्टफोलिओमधील भावी उत्क्रांतीला, म्हणजेच एसयूव्हीच्या नवीन प्रजातीला सादर करते, जिच्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान, अपवादात्मक आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. या व्हेईकलला वरचढ ठरवणारी बाब म्हणजे इंटेरिअर्समध्ये शाश्वत साहित्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामधून हरित भविष्याप्रति आमची कटिबद्धता दिसून येते.
असे असताना देखील किया सिरॉस प्रबळ मूल्य तत्त्व, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि अद्वितीय दर्जा देते, जो भारतातील आधुनिक ड्रायव्हर्सच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्न आहे.किया सिरॉसमध्ये सेगमेंट फर्स्ट ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्टिम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्यासाठी डिलरशिपला भेट देण्याची गरज नाही.
हे इनोव्हेशन सामान्यतः लक्झरी व्हेईकल्समध्ये दिसून येत आहे. किया कनेक्ट २.० सिस्टिममध्ये ८० हून अधिक वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे,जी विनासायास कनेक्टिव्हिटी आणि इंटेलिजंट व्हेईकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्साहित करत आहे.तसेच, कियाने किया कनेक्ट डायग्नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना दुरूनच त्यांच्या व्हेईकलच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते आणि किया अॅडव्हान्स्ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्लेसमेंट्स व मेन्टेनन्स अशा आवश्यक सर्व्हिसेसबाबत माहिती देते,ज्यामधून विनासायास मालकी हक्काची खात्री मिळत आहे.
२,५५० मिमी व्हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्या आरामदायीपणाला प्राधान्य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते,ज्यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळतो.