Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे, जी त्यांना दरमहा आर्थिक मदत पुरवते. परंतु अलीकडेच या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता शासन अशा महिलांची छाननी करत आहे ज्या या योजनेचा लाभ पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन करून घेत आहेत.
या महिलांना नाही मिळणार या योजनेचा लाभ
विशेषतः ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे, ज्यांनी याआधी अन्य सरकारी वैयक्तिक योजना घेतल्या आहेत किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांचा या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना त्वरीत जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे अर्जांची संख्या प्रचंड वाढली. पहिल्या दोन महिन्यांतच महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केला. ही आकडेवारी सरकारसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आणि इतर योजनांवरील खर्च कमी करून निधी या योजनेसाठी वळवण्यात आला.
आतापर्यंत बारा लाख महिलांचा लाभ बंद
प्रशासनाने आता अधिक काटेकोरतेने लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे १२ लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी सन्मान निधीसह अन्य योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा समावेश आहे.
सरकारच्या मते, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून चुकीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे अशा महिलांचा तपशील आता आयकर विभागाच्या माध्यमातून मिळवला जाणार आहे. आधार आणि पॅनकार्ड लिंक करून या महिलांची खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचा हप्ता थांबवला जाणार आहे.
या योजनेच्या अटींनुसार, लाभार्थी महिलांचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत बऱ्याच अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची खातरजमा न करता थेट लाभ दिला गेला. आता ही चूक सुधारण्यासाठी शासन पावले उचलत आहे. शासनाच्या या कारवाईमुळे खऱ्या गरजू महिलांना फायदा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर अजून कोणत्याही अधिकाऱ्यांकडे या बदलाची स्पष्ट माहिती नाही. त्यांना अजून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे कळते. त्यामुळे हा बदल केवळ राज्यस्तरीय प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसून येते. या प्रक्रियेमुळे अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थींनी आपले उत्पन्न, कागदपत्रे आणि पात्रतेशी संबंधित माहिती शासनासमोर स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून चुकीच्या माहितीमुळे त्यांचा लाभ थांबणार नाही.
एकूणच, लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्रता ठरवण्यात आता सरकार अधिक पारदर्शकतेने आणि काटेकोरपणे पुढे जात आहे. यामुळे गरजू महिलांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल, असा शासनाचा उद्देश आहे. मात्र, यामध्ये कोणतीही अपात्र महिला लाभ घेत असल्यास, त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.