Lemon Price: ‘या’ ठिकाणी लिंबूला मिळतोय विक्रमी दर; पण, याचा फायदा शेतकऱ्यांना नाही; तर……

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) शेतकरी बांधवांना शेतीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टी (Heavy Rain) पावसाच्या हाहाकारामुळे खरीपातील कापूस, सोयाबीन समवेतच सर्व पिकांची मोठी नासाडी झाली होती.

केवळ खरीप हंगामातच निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता असे नाही तर रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना देखील यामुळे मोठा फटका बसला होता.

खरीपाच्या तुलनेत रब्बी हंगामात नुकसान जरी कमी असले तरी देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पुरेसे होते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांना बसला असे नाही तर याचा फटका हंगामी पिकांना देखील बसत आहे.

यामुळे कलिंगड आणि लिंबू सारख्या हंगामी पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र बाजारपेठेच्या गणितानुसार उत्पादनात घट म्हणजे बाजारभावात दमदार वाढ या पद्धतीनेच कलिंगड (Watermelon) आणि लिंबूच्या (Lemon) बाबतीत होत आहे.

सध्या कलिंगड आणि लिंबाला बाजारपेठेत चांगला विक्रमी दर (Lemon Price) मिळत आहे. सध्या राज्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे, त्यामुळे लिंबाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, लिंबू उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचा भाव सुमारे 250 रुपये किलो आहे. गेल्या 10 वर्षांत असे घडले नाही, ते या उन्हाळ्यात घडले आहे.

सोलापूर एपीएमसीमध्ये नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात लिंबाला चांगला ऐतिहासिक दर मिळत आहे मात्र असे असले तरी याचा फक्त काही बोटावर मोजण्याइतक्याच लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे.

उत्पादनात घट आली असल्याने सध्या काही ठराविक शेतकऱ्यांकडेच लिंबू शिल्लक आहेत यामुळे याचा फायदा थोड्याच शेतकऱ्यांना होत आहे.

असे असले तरी यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र एपीएमसीमध्ये बघायला मिळाले होते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोलापूर एपीएमसीमध्ये लिंबाला सर्वाधिक दर मिळत आहे.

राज्यातील इतर एपीएमसीच्या तुलनेत सोलापूर एपीएमसीमध्ये अधिक दर मिळत असल्याने अनेक लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा सोलापुर एपीएमसीकडे वळवला आहे.

असे असले तरी अजूनही लिंबाची आवक खूप नगण्य आहे कारण की उत्पादनात खूपच अधिक प्रमाणात घट झाली आहे. सध्या सोलापुर एपीएमसीमध्ये अडीचशे रुपये किलो या दराने लिंबाची विक्री होत आहे अर्थातच दहा रुपयाला एक नग या पद्धतीने लिंबाची विक्री होत असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी थोडे का होईना समाधानी आहेत.

एपीएमसी मधील व्यापाऱ्यांच्या मते, गत दोन आठवड्यापासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे शीतपेयाच्या मागणीत वाढ झाली आहे. शीतपेयाच्या मागणीत वाढ झाली असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ होणे सहाजिक आहे. लिंबाच्या मागणीत एकीकडे वाढ होत आहे तर दुसरीकडे लिंबाचा पुरवठा होत नसल्याने सध्या लिंबाला विक्रमी दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe