LIC ADO Recruitment 2023 : जर तुम्हाला LIC ADO मध्ये नोकरी करायची असेल तर आत्ता लगेच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. कारण आज या भरतीप्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया आज संपत आहे. उद्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन तुम्ही आजच अर्ज करा. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 9,394 पदांची भरती केली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा
LIC ADO अधिसूचना जारी करण्याची तारीख – 21 जानेवारी 2023
LIC ADO नोंदणीसाठी सुरुवातीची तारीख – 21 जानेवारी 2023
LIC ADO नोंदणी अंतिम तारीख – 10 जानेवारी 2023
LIC ADO प्रवेश पत्र तारीख – 04 मार्च 2023
एलआयसी एडीओ प्रिलिम्स परीक्षेची तारीख – 12 मार्च 2023
LIC ADO प्रीलिम्स निकालाची तारीख – मार्च 2023
वय किती असावे?
LIC ADO भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
पात्रता काय हवी?
ADO भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावेत. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
प्रिलिम परीक्षेची तारीख
एलआयसी एडीओ प्राथमिक परीक्षा 12 मार्च रोजी घेतली जाईल. 4 मार्च रोजी प्रवेशपत्र जारी केले जाईल. त्याचबरोबर मुख्य परीक्षेची नवीन तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा 23 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. यापूर्वी ते 08 एप्रिल 2023 रोजी होणार होते, परंतु आता ते वाढविण्यात आले आहे.
निवड तीन टप्प्यात होणार
या पदांसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षांच्या आधारे केली जाईल. यामध्ये प्रिलिम, मेन आणि नंतर मुलाखत यांचा समावेश होतो. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.