रेल्वे प्रवासात मोबाईल हरवला?, टेंशन घेऊ नका; ‘या’ अ‍ॅपवर तक्रार नोंदवून मिळवा त्वरित मदत

अनेकदा रेल्वे प्रवासादरम्यान कित्येकांचा मोबाइल फोन हरवतो. मात्र, आता हरवलेला मोबाईल झटपट शोधता येणार आहे. ‘रेल मदत अ‍ॅप’ आणि ‘संचार साथी’ प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्हाला मोबाईल ब्लॉक व ट्रेस करता येणार आहे.

Published on -

Rail Madad App | रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. देशभरात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असताना अशा घटनांचा वेगही वाढतो आहे. पण आता अशा परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने आणि Department of Telecommunications (DoT) ने एकत्र येऊन एक अत्यंत उपयुक्त प्रणाली विकसित केली आहे — Rail Madad App.

मोबाईल हरवल्यास प्रवाशांची मोठी अडचण होते. अनेक महत्त्वाचे डेटा, संपर्क, OTP सिस्टीम्स, बँकिंग अ‍ॅप्स सगळं काही मोबाईलवर असल्यामुळे, मोबाईल हरवणं म्हणजे एक आर्थिक आणि मानसिक त्रासदायक अनुभव ठरतो. या समस्येवर उपाय म्हणून ‘Rail Madad App’ वापरकर्त्यांना त्यांच्या हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी सहज नोंदवण्याची सुविधा देते.

Rail Madad App नेमकं काय?

रेल्वे सुरक्षा बल ( RPF ) आणि संचार मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘संचार साथी’ या पोर्टलला रेल मदत अॅपशी जोडण्यात आले आहे. या अ‍ॅपवर तक्रार नोंदवली की ती ‘संचार साथी’ पोर्टलकडे पाठवली जाते आणि तिथून संबंधित मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे तो मोबाईल वापरणं अशक्य होतं आणि ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू होते.

सध्या देशातील 17 रेल्वे झोन्समध्ये आणि 70 हून अधिक विभागांमध्ये या प्रणालीचा उपयोग सुरू आहे. CEIR (Central Equipment Identity Register) या प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत 30 लाखांहून अधिक मोबाईल डिव्हाइसेस ब्लॉक करण्यात आल्या असून, यातील 18 लाख मोबाईल ट्रेस करण्यात आले आहेत. यापैकी 3.87 लाख मोबाईल पोलिसांनी परत मिळवले आहेत.

इतर प्रवासी समस्यांवरही तोडगा-

विशेष म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक अशा काही राज्यांनी यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मोबाईल हरवण्याच्या किंवा चोरीला जाण्याच्या घटनेनंतरही प्रवाशांना तो परत मिळवण्याची आशा असते.

‘Rail Madad App’ केवळ मोबाईल चोरीच नाही, तर इतरही अनेक प्रवासी समस्यांवर उपाय देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. स्वच्छता, सुरक्षेची तक्रार, आरक्षण समस्यांसह विविध सेवा यात समाविष्ट आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe