Lowest Home Loan : सर्वात स्वस्त गृहकर्ज पाहिजे? ‘या’ 10 बँकांवर एकदा नजर टाका; मिळेल सर्वात कमी व्याजदर

Ahilyanagarlive24 office
Published:

Lowest Home Loan : स्वतःचे एक चांगले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा वेळी अनेकजण घर बांधण्याकरिता गृहकर्ज घेत असतात. मात्र अशा वेळी गृहकर्ज घेतल्यानंतर त्याचे व्याज हे अधिक प्रमाणात असते.

यामुळे ग्राहकांना अधिक रक्कम भरावी लागते. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी अशा 10 बँकांबद्दल सांगणार आहोत जे कर्ज महाग झाल्यानंतरही इतर बँकांच्या तुलनेत सर्वात स्वस्त गृहकर्ज दर देत आहेत.

गृहकर्ज घेताना ईएमआय आणि व्याजदर ठरवण्यात अनेक घटक भूमिका बजावतात. गृहकर्ज देताना तुमचे वय, पात्रता, तुमच्या घरातील आश्रित सदस्यांची संख्या, तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न, तुमची मालमत्ता आणि दायित्वे, बचतीचा इतिहास आणि नोकरीची सुरक्षितता यांचाही विचार केला जातो.

– इंडसइंड बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.4 टक्के आणि कमाल 9.75 टक्के गृहकर्ज देत आहे.
– इंडियन बँक किमान 8.45 टक्के आणि कमाल 9.1 टक्के गृहकर्ज देत आहे.
– HDFC बँक किमान 8.45 टक्के आणि कमाल 9.85 टक्के गृहकर्ज देत आहे.
– UCO बँकेत गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.45 टक्के आणि कमाल व्याज 10.3 टक्के आहे.
– बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.5% ते 10.5% दराने गृहकर्ज देत आहे.
– बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना किमान 8.6 टक्के आणि कमाल 10.3 टक्के गृहकर्ज देत आहे.
– युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गृहकर्जाचा किमान व्याजदर 8.75 टक्के आणि कमाल व्याजदर 10.5 टक्के आहे.
– IDBI मधील गृहकर्जाचा व्याजदर 8.75 टक्क्यांवरून 10.75 टक्क्यांवर जातो.
– पंजाब नॅशनल बँकेत गृहकर्जाचा व्याजदर 8.8 टक्के ते 9.45 टक्के आहे.
– कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर 8.85 टक्के ते 9.35 टक्के आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe