Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोपडपल्याने अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढला आहे. तसेच आजही आंही मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील या भागात कोसळणार मुसळधार पाऊस
राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असला तरी आता हवामान विभागाकडून आणखी मुसळधार पावसाचा इशारा अनेक भागांना दिला आहे. राज्यातील कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने मातीसह पीकही वाहून गेले आहे.
हवामान विभागाने गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. रत्नागिरी आणि मुबई शहरात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही भागात अजूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांची कामे रखडली आहेत.