महाराष्ट्र तैयार है! महाराष्ट्राकडे बोट करणाऱ्या भाजपला शरद पवारांचे उत्तर

Content Team
Published:

मुंबई : उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत.

या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने (Bjp) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला होता.

निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप (Bjp) नेते ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

पवार म्हणाले, महाराष्ट्र (Maharashatra) अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे.

तसेच आगामी काळात याबाबत चर्चा करता येईल. आगामी अधिवेशनाच्या काळात आम्ही दिल्लीत असू त्यावेळी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करता येईल. यातून मार्ग काढता येईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार आजच्या निकालानंतर म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी काँग्रेसला धीर दिला आहे. ते म्हणाले, अशी स्थिती राजकीय जीवनात येत असते. १९७७ लाही अशीच परिस्थिती आली होती. सर्वच राज्यात काँग्रेस हारली होती.

तेव्हा अनेक लोक बोलले की काँग्रेस संपली आहे. मात्र काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो.

त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच गोव्यात काँग्रेसची ही स्थिती बदलणार याची मला खात्री आहे, असेही पवार म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe