महाराष्ट्राचा नकाशा बदलणार ! ‘या’ मुहूर्तावर राज्यात तयार होणार 20 जिल्हे अन 81 तालुके, महसूलमंत्र्यांनी स्वतः दिली माहिती

Published on -

Maharashtra News : राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करावेत अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जाते. यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असतो. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे कधीच जमा झालाय.

पण शासनाने या प्रस्तावावर अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. दरम्यान आता याच संदर्भात फडणवीस सरकारकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा निर्मितीवर मोठं भाष्य केलं आहे.

मंत्री बावनकुळे काल चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात 20 नवीन जिल्हे 81 नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे.

तसेच 2021 ची जनगणना, भौगोलिक स्थिती, सीमांकन झाले की जिल्हा व तालुका निर्मिती बाबत निर्णय होईल अशी माहिती दिली. जिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्याची निर्मिती केली जाईल असे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

महसूलमंत्र्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा जिल्हा व तालुका निर्मितीचा विषय चर्चेत आला आहे. एक मे 1960 रोजी राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यात नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे.

राज्याची स्थापना झाली त्यावेळी 26 जिल्हे होते. आता ही संख्या 36 आहे. पालघर हा राज्यातील सर्वात नवा जिल्हा बनलाय. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून 2014 मध्ये याची निर्मिती झाली.

दरम्यान आता अहिल्यानगरमधून शिर्डी, नाशिकमधून मालेगाव, साताऱ्यातून कराड असे नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये एकूण 358 तालुके आहेत. राज्याच्या मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका तयार करण्यात आलेला नाही.

मुळात जिल्ह्याचे क्षेत्रफळ कमी आहे यामुळे येथे तालुका तयार करण्याची गरज भासलेली नाही. दरम्यान आता राज्यात नवीन जिल्हे आणि तालुके तयार होणार आहेत. यामुळे भविष्यात राज्याचा नकाशा पूर्णपणे चेंज होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News